“भाजपने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल”

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.

ईडी अधिकाऱ्यांचं एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झालं. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

नवाब मालिक सातत्याने खरं बोलत होते. त्यामुळेही झालं असेल. कारण सातत्याने आम्हाला धमकी दिली जात आहे, त्यामुळे मला त्याच आश्चर्य वाटत नाहीत. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. भाजपचे आणि ईडीचे अध्यक्ष एक असतील. किंवा भाजपने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

माझा ईडीचा काही अभ्यास नाही. जाणीवपूर्वक ठरवून या गोष्टी केल्या जात असल्याचं मत सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. ट्विटर या माध्यमाचा खूप चांगला उपयोग भाजपचे लोकं या धमक्यांसाठी करत आहेत. हे निदर्शनास आलंय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आश्चर्य वाटत नाही, की नवाब भाईकडे ईडीची नोटीस आली आहे. कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट करत असतात. असे म्हणण्यापेक्षा ट्विट करत याला अटक करणार आहे त्याला अटक करणारे, अशी धमकी देतात. गेले अनेक दिवस, अनेक महिने महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना ईडीची नोटीस आलेल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

एवढंच नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात बोललं जात आहे. त्या त्या ठिकाणी चौकशी, ईडीच्या नोटीस आल्या आहेत. याबाबत मी स्वतः संसदेत बोलले होते, असंही त्या म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या- 

नवाब मलिकांवरील कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

मलिकांवर झालेल्य कारवाईनंतर शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

ईडीकडून मंत्री नवाब मलिकांची पहाटेपासून चौकशी सुरू, काय आहेत आरोप? 

राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार झटका; रात्री बारा वाजता केला करेक्ट कार्यक्रम 

“येत्या विधानसभेत 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणारच”