“ते कधीपासून हिंदू झाले ते पाहावं लागेल”; संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांपासून ते हिंदूत्वाच्या मुद्द्यांवर भांडण होत आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या सहाय्यानं महाराष्ट्र सरकार उलथवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारचे नेते करत आहेत.

महाविकास आघाडीच्या सर्व आरोपांना भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच आता राज्यात हिंदूत्वाचा मुद्दा परत एकदा चर्चेत आला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

भाजपनं शिवसेना आता हिंदूत्वाशी प्रमाणिक राहिली नसल्याची टीका केली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला घेरलं आहे.

भाजपचं हिंदूत्व हे त्वचेसारखं आहे तर शिवसेनेचं हिंदूत्व हे शालीसारखं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच ते कधीपासून हिंदू झाले ते तपासून पहावं लागेल, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

शिवरायांना उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्लीतून आक्रमणं झाली. काहींची बोटं छाटली गेली. औरंगजेबही महाराष्ट्रावर चालून आला होता, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, एमआयएमनं महाविकास आघाडीबाबत एक वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  …म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ

  पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  ‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य

  लाईव्ह मॅच सुरू असताना गॅलरी ढासळली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

  “फक्त म्हणायला ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेतं पवार सरकार”