’30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण…’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | देशात अनेकदा धर्म आणि जातीवरून वाद उफाळून आले आहेत. प्रत्येक जाती-धर्माला आपापल्या प्रथेप्रमाणं राहण्याची मुभा भारतीय संविधानानं दिली आहे.

अवघ्या देशाला सध्या कर्नाटकमधील एका शाळेतील हिजाब प्रकरणानं दोन गटात विभागलं आहे. शाळेत हिजाब घालून जाण्याच्या हक्कांचं हे प्रकरण आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयानं हिजाब प्रकरणावर निर्णय देताना शाळेत धार्मिक वस्त्र परिधान करण्यास बंदी घातली आहे. परिणामी सध्यातरी हा वाद मिटला आहे.

हिजाब प्रकरणावर आता भाजपचे आमदार अनिल बोडें यांच्या वक्तव्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या बोंडे यांच्या वक्तव्याची जास्त चर्चा होत आहे.

हिजाबबाबत जर अशीच परिस्थिती राहिली आणि असेच जर आपण हातावर हात देऊन उभं राहीलो तर 30 वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य बोंडेंनी केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला. तुळजापूरची भवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली, असं वक्तव्य बोंडेंनी केलं आहे.

अयोध्या, काशी आणि मथुरा इथली परिस्थिती वेगळी आहे कारण तिथं शिवाजी महाराज नव्हते म्हणून मंदीराच्या बाजूला मस्जिद उभी राहिली, असंही बोंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष जोरानं केला पाहीजे. सर्वांनी शिवाजी महाराज समजून घेतले पाहीजेत, असंही बोंडे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस

  …म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ

  पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  ‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य

  लाईव्ह मॅच सुरू असताना गॅलरी ढासळली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ