“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंवर औरंगाबाद येथील सभेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वातावरण तापलेलं आहे.

सभेपुर्वीच परवानगी देण्यावरून राजकारण पेटलेलं होतं. तरी पोलीस आयुक्तांनी नियम लावत परवानगी दिली. सभेत बोलताना राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं होतं.

4 तारखेपर्यंत राज्यातील भोंग्याबाबत निर्णय घेण्यात यावा, असा अल्टिमेटम राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं राज ठाकरेंचं भाषण तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अशाप्रकारचे गुन्हे दाखल होत असतात आमच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

कायद्याचं उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल होतो. राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायची काम करण्यात येत आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

ज्यांची ताकत नाही ते लोक असं करत आहेत. शेवटी सुपारीचं राजकारण आहे पण हे राजकारण राज्यात चालत नाही, असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्यात काहीही गडबड आणि सुपाऱ्यांचं राजकारण चालणार नाही कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राज्य गृह खात्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात बैठका घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “अहो आदित्यजी अशा घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे इतिहास….”

“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”; भीम आर्मीचा राज ठाकरेंना गंभीर इशारा

 सर्वांत मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज्यातील सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! 

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढलं