“मी पुन्हा सांगतोय, बाप-लेक जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार”

मुंबई | जगात सध्या युक्रेन-रशिया युद्ध चालू आहे तर राज्यात महाविकास आघाडी-भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध चालू आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार त्रास देत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याची टीका राज्य सरकारनं केली आहे.

संक्तवसूली संचनालय म्हणजेच ईडी राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी कारवाई करत आहे. ईडीच्या वाढत्या कारवाईनं केंद्र आणि राज्यातील संबंध ताणले जात आहेत. ईडीच्या कारवाईला भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांची किनार लाभलेली आहे.

किरीट सोमय्यांनी विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडीतील एक-एक नेते तुरूंगात जाणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.

सोमय्या यांच्या टीकेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली आहे. सोमय्या यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कारवाई करणार असल्याचं भाकीत आता राऊत यांनी केलं आहे.

उच्च न्यायालयानं निल सोमय्यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता राऊत यांनी परत एकदा सोमय्यांना इशारा दिला आहे. मी परत सांगतोय सोमय्या पिता-पुत्र जेलमध्ये जाणार, माझे शब्द ध्यानात ठेवा, असं राऊत म्हणाले आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून वसूली करणाऱ्या सर्वांवर कारवाई नक्की होणार आहे. महाराष्ट्र झुकणार नाही, असा इशारा राऊतांनी सोमय्यांना दिला आहे. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर सत्तासंघर्ष वाढला आहे. आयकर विभागानं शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर राजकारणात  वेगवान घडामोडी घडत आहे.

पाहा ट्विट – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग! बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील म्हणाले… 

रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार

“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”

युरोपियन संसदेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट थांबेना; पाहा व्हिडीओ

पोस्टाची भन्नाट योजना! खातं उघडल्यावर मिळणार दरमहा ‘इतके’ हजार रूपये