“आर्यनकडे ड्रग्ज आढळलंच नव्हतं, तो कटात सामील नव्हता”

मुंबई | गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केली होती. यानंतर एकच खळबळ माजलेली. आता या प्रकरणी एनसीबीने मोठा खुलासा केला आहे.

आर्यन खान (Aryan Khan) हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) विशेष तपास पथकाला (SIT) आढळून आलं आहे.

एनसीबीच्या मुंबई विभागाने केलेल्या आरोपांच्या विरोधात एसआयटीचे काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. चॅट्स असे सुचवत नाहीत की आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता, असं एनसीबीने म्हटलंय.

NCB मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असे निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढले आहेत.

गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 21 ग्रॅम गांजा, MDMAच्या 22 गोळ्या आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त केले होते.

एनसीबीने 14 जणांना रोखलं होतं आणि काही तासांच्या चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात एनसीबीने आणखी 17 जणांना अटक केली. व्हॉट्सअॅप चॅट्सचा आधार घेत वानखेडे यांच्या टीमने दावा केला की हे आरोपी ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा भाग आहेत.

महत्वाच्या बातम्या-   

‘या’ भागात जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज 

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला, म्हणाले… 

मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग! बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील म्हणाले… 

रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार

“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”