राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत

मुंबई | ही लढाई चीन बरोबर आहे. काँग्रेस-भाजप अशी लढाई होवू नये. केंद्र सरकारने चीन सोबत लढावं विरोधकांशी लढू नये, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही. देशातील सर्व नागरिक राष्ट्रभक्त आहे, असा टोलाही राऊतांनी लगावलाय.

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले यावर केंद्र सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे. राहूल यांचे प्रश्न जरी चुकीचे असतील तरी सरकारने बरोबर उत्तर द्यावं, असं संजय राऊत म्हणाले.

चीनचे आर्थिक कंबरडे मोडावे ही सगळ्यांची भूमिका आहे. चीनच्या गुंतवणूतीबाबतही आर्थिक धोरण ठरवलं पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसंच होवू नये, असंदेखील राऊत म्हणाले.

भारत-चीन सीमावाद हा विषय राजकीय धोरणात्मक आहे. याचे राजकारण होवू नये. सीमेवर आपले जवान समर्थ आहेत. चीनने हल्ला केल्यास सरकारने त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मुभा सैन्याला दिली असल्याचे मी वाचले आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

-टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

-अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

-केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची नियमावली जारी; कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम