संजय राऊत यांनी युतीच्या जागावाटपाचा सांगितला ‘हा’ फॉर्म्युला

नाशिक | शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌ीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे. शहा यांनी सांगितलेला प्रस्तावच अखेरचा असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात भाजपला जास्त जागा देणाऱ्या फॉर्म्युल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी या जागावाटपाची खिल्ली उडविली आहे. भाजपचा हा प्रस्ताव माध्यमातच असून, आमच्यापर्यंत आला नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नाशिक दौऱ्यात राऊतांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या मुखपत्रातून रोहित पवार यांच्या केलेल्या कौतुकोद्वगाराचे समर्थन केले आहे. राजकारणात येणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या तरुणांना उत्तेजन दिलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

विरोधी पक्षातील एखादा चांगला कार्यकर्ता घडत असेल, तर त्याच्या जडणघडणीत सत्ताधाऱ्यांनीही योगदान दिलं पाहिजे, असं सांगत खासदार राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

राजकारणात नवी पिढी उदयाला येत असतांना त्यांच्या पक्षाऐवजी, कुटुंबाऐवजी त्यांच्या कामाकडे बघून त्यांचं कौतुक करायला हवं, असं सांगत राऊतांनी रोहित पवारांच्या कामांचं समर्थन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-