“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही”

मुंबई | उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधल्या निवडणूक निकालांवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी वाहात होते. तरी भाजपाला मतदान झालं. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहातो. त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

मोदी निवडणुकांकडे उत्सव म्हणून पाहतात आणि या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. मग हे लोक बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे प्रश्न निवडणुकांपुरते विसरून जातात, असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं चार राज्य सहज जिंकली. त्यात उत्तर प्रदेश जिंकल्याचा जल्लोष आजही सुरूच आहे. पण सीमेवरील पंजाब राज्यात भाजपचं पूर्ण पानिपत का झालं? त्यावर कुणीच बोलत नाही. आपनं दिल्ली ते पंजाब हातपाय पसरले. गोव्यात ते शिरले. हे चित्र काय सांगतं?, असं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशवर भाजपानं पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं. पण समाजवादी पार्टी 42 वरून थेट 125 पर्यंत गेली. त्यांचे जवळपास 100 उमेदवार 200 ते 500 मतांच्या फरकानं पराभूत झाले. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला 18 जागा गमवाव्या लागतील हे आता स्पष्ट झालं आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रियांका गांधींनी मोदी-शहा यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली. पण त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांनी थोडं आधी मैदानात उतरायला हवं होतं. पण आज त्या जे प्रयत्न करत आहेत, त्याचा फायदा त्यांना 2024 मध्ये होईल, असं राऊत म्हणालेत.

काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावल्याचं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे. खरी लढाई भाजपासाठी पंजाबमध्ये होती. पण तिथून भाजपनं पळ काढला आणि जेमतेम दोन जागा जिंकल्या, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान 

“सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली” 

“राज्यपाल सावित्रीबाईंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का?” 

राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले “संजय राऊतांनी….” 

“परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो”