मुंबई | आजची सभा ही शंभर सभांची बाप असेल. आजची सभ सांगते मुंबईचा बाप फक्त शिवसेना. आमचा बाप एकच हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहे. तसेच शिवसेना आणि महाराष्ट्र कुणापुढे झुकणार नाही, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
खऱ्या तोफा काय असतात हे आज महाराष्ट्राला दिसणार आहे, असंही राऊत म्हणालेत. ते बीकेसी मैदानावरील शिवसेनेच्या सभेत बोलत होते. यावेळी हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही, असंही ते म्हणालेत.
शिवसेनेचं हिंदुत्व छत्रपती संभाजीराजेंसारखं, प्राण जाये पण वचन न जाये. हैद्राबादवरून ओवेसी आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतो. महाराष्ट्राच्या भावनांचा आणि स्वाभिमानाचा हा अपमान, असंही राऊत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…”
‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान