“राजनाथ सिंहांना मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल पण चुकून उद्धव ठाकरेंना लागला”

मुंबई | महाराष्ट्रातील राजकीय वातावरण शांत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून रणधुमाळी सुरू आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पांठिंबा जाहीर केला आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदारांसोबतच्या बैठकीत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनद्वारे झालेल्या संभाषणाचा उलगडा केला आहे.

राजनाथ सिंहांचा मला फोन आला आणि ते अस्सलाम वालेकुम म्हणाले. यावर संताप व्यक्त केल्यानंतर त्यांनी जय श्री राम म्हणत संभाषण सुरू ठेवलं, असा खुलासा उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी खासदारांसोबत झालेल्या बैठकीत केला होता.

उद्धव ठाकरेंच्या खुलाशानंतर या संभाषणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगत आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत राजनाथ सिंहांना टोला लगावला आहे.

राजनाथ सिंह यांना मेहबुबा मुफ्ती यांना फोन करायचा असेल. पंरतू चुकून मातोश्री येथे उद्धव ठाकरेंना फोन लागला असावा, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

राजकारण रंगत असताना अशा प्रकारचा कोणताही संवाद झाल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाकारलं आहे. राजनाथ सिंह यांना विचारणा केली असता त्यांनी असं काहीही झालं नाही म्हणाले. त्यामुळे हे सर्व खोटं असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.

दरम्यान, 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएकडून राजनाथ सिंह यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सिंग देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना फोन करून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील फोन केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘राजनाथ सिंहांचा फोन आला आणि म्हणाले अस्सलाम वालेकुम’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

‘मला ईडी आली नाही पण फक्त…’, बंडखोरीनंतर शीतल म्हात्रेंचं स्पष्टीकरण

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीचा मोठा दावा, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ

शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं सूचक ट्विट, म्हणाले…

‘काय तो दांडा आणि काय ते ढुं..’ म्हणत शिंदे गटावर निशाणा साधणाऱ्या प्रवक्त्याही शिंदे गटात!