“एकाच सरणावर 24-24 प्रेतं जाळली गेली, तेव्हा बिळात लपून बसले होते”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना ईडीने नोटीस दिली असताना संजय राऊत यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात संजय राऊत विरूद्ध चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळतंय.

सुपातलं जात्यात जात आहेत, आधीच्याच पीठ झालंय आणि सगळे शेवटी चक्की पिसणार आहेत, असं चद्रकांत पाटील यांनी असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय.

कोविडवर हे बोलतात, पण मोदींनी लस दिली. पीपीई किट दिलं त्यावेळी ते बिळात लपून बसले होते. पण नगरमध्ये एकाच सरणावर 24-24 प्रेतं जाळली गेली, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

एका रूग्णवाहिकेत 20 डेडबॉडी नेल्या, त्याचं काय करायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जगातल्या 60 देशांमध्ये जितकं इन्फेक्शन होतं, तेवढं इन्फेक्शन महाराष्ट्रात होतं, असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलंय.

लोकांवर अनेक संकटं आली होती. कोरोना काळात महाराष्ट्राची बदनामी झाली, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं.

अनिल देशमुखांना वाटलं की लगेच जामीन मिळेल, ठाकरे कुटुंबीयांवरही आरोप झाले, इतकी वाईट परिस्थिती आली की किरीट सोमय्यांवर ही हल्ला करावा सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राऊत आणि पाटील यांच्यातील कलगीतुरा आणखी रंगणार असल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम