“हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. ते जळगावमध्ये सभेत बोलत होते.

काहीतरी करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. पण हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे असे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

सत्य बाहेर आणलं पाहिजे आणि त्यात दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. चांगलं काम कसं असतं हे बारामतीला गेल्यावर पाहायला मिळतं. पवार यांच्यावर सर्वच पक्षातून प्रेम करणारे लोक आहेत. त्यांचं नेतृत्व मी मान्य केलं आहे, असं खडसे म्हणाले

मला स्वप्नातही वाटत नव्हतं की हे तीन पक्ष एकत्र येतील. पण त्यांनी करून दाखवले’, असंही खडसे म्हणाले.

फडणवीस हे पवार यांची खिल्ली उडवत होते. मात्र पवार यांनी एका रात्रीत चित्र बदलले. हे फक्त पवार करूच शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलणारा नेता म्हणून पवार यांना ओळखलं जातं, असं म्हणत खडसेंनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे.

कोणत्या क्षणाला कोणता निर्णय घ्यावा, हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. पवार दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असं खडसेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नवरा जेलमध्ये, पत्नीला हवंय मूल; न्यायालयानं दिला मोठा निर्णय 

Multibagger penny stock | ‘या’ शेअरचा धुमाकूळ, गुंतवणुकदार मालामाल 

“जर कोणी भारताला छेडलं तर त्याला आम्ही सोडणार नाही” 

“पप्पू आणि बबली काँग्रेसमध्ये राहतील तोपर्यंत…”, भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य 

टेन्शन वाढलं! चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा