मुंबई | ज्या शिवसेनेला देवाचं आणि धर्माचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून प्रिय आहे किंबहुना त्याच मुद्दांवर शिवसेना राजकारण करत असते मात्र आज शिवसेना किती बदललीये?? याचं मूर्तीमंत उदाहरण आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी दाखवून दिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर’देवांनी मैदान सोडलं’ या मथळ्याखाली राऊत यांनी प्रबोधनात्मक अग्रलेख लिहीला आहे. (Sanjay Raut Editorial Samana over Corona)
कोरोना विषाणूचा कहर असा की, सगळेच शक्तिमान देश जणू मरून पडले. मक्केपासून व्हॅटिकनपर्यंत, बुद्ध गया मंदिरांपासून ते शिर्डी, सिद्धिविनायकापर्यंत सर्वत्र ‘सन्नाटा’ पसरला आहे. माणसांवर येणाऱ्या प्रत्येक संकटप्रसंगी ईश्वर सर्वप्रथम मैदान सोडून जातो. कोरोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले आहेत, असं वास्तव सांगणारं चित्र राऊत यांनी आजच्या अग्रलेखातून रेखाटलं आहे. (Sanjay Raut Editorial Samana over Corona)
एक विषाणू देवावर आणि धर्मावर भारी पडला त्यामुळे कित्येक वर्षांपूर्वी गाडगेबाबांनी सांगितलेला माणुसकीचा धर्म हाच खरा धर्म असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच कोणत्याही देवाने हा विषाणू थांबवण्यासाठी काहीही केलं नाही. आपल्यालाच मास्क आणि सॅनिटायझररूपी तिर्थ आपल्या हातावर घ्यावं लागत आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut Editorial Samana over Corona)
दरम्यान, संजय राऊत यांनी लिहिलेला आजचा अग्रलेख वाचकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळतोय. अनेकांनी राऊत यांच्या अग्रलेखाचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. (Sanjay Raut Editorial Samana over Corona)
महत्वाच्या बातम्या –
-औरंगाबादकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कारण ‘त्या’ महिलेनं केली सात दिवसात कोरोनावर मात
-सावधान ! महाराष्ट्रात कोरोनाने घेतला दुसरा बळी
-“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प पुर्ण करुया, भारताला कोरोनापोसून वाचवूया”
-“विराट इतर खेळाडूंसारखा नौटंकी करत नाही, क्रिकेटप्रती त्याला आदर आहे”