“संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त वर्तमानपत्र चालवावं”

मुंबई | एकनाथ शिंदेंचं बंड ते महाराष्ट्रातील सत्तांतर अशा असंख्य राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन 15 दिवस उलटून गेले मात्र मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही.

मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना व शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. यावेळी राऊतांवर टीका करताना शिरसाट यांची जीभ चांगलीच घसरली.

संजय राऊत मुर्ख माणूस आहे. त्याला अजून राजकारण माहिती नाही, अशी बोचरी टीका शिरसाट यांनी केली आहे. तर त्यांनी वर्तमानपत्र चालवावं दुसरं काही करू नये, असंही शिरसाट म्हणाले.

संजय राऊतांवर बोलणं मला खरंच योग्य वाटत नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंना छोटं करण्याचं काम केलं आहे. ते आता शिवसेनापक्षप्रमुखांना छोटं करण्याचं काम करत आहेत, असा घणाघाती आरोप शिरसाट यांनी केला आहे.

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांचा सन्मान कमी करण्याचं काम संजय राऊत करत आहेत, असंही शिरसाट म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘चार गाढवं एकत्र चरत असली तरी हुकुमशहाला भिती वाटते’, शिवसेनेचा हल्लाबोल

बंडानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार, शिवसेना नेत्याने मानले भाजपचे आभार

‘संजय राऊतांनी गजनी बघावा’, भाजप नेत्याचा हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव नामांतर, शिंदे सरकारचा मोठा निर्णय