‘मी स्वत:लाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो’, एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर आमदाराचं मोठं वक्तव्य

मुंबई | एकनाथ शिंदेंसह सेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं व एकनाथ शिंदेंचं नवं शिंदे सरकार राज्यात सत्तेत आलं.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंसाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात मी मुख्यमंत्री झालो आहे यावर विश्वासच बसत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तर दुसरीकडे किशोर पाटील मी स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो असं म्हणल्याने चर्चांना उधाण आलं.

एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वी किशोर पाटील यांनी भाषण केलं. तर गेल्या अडीच वर्षात राज्यमंत्र्यांचे हाल झालेत, अशी खंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली.

जवळचा माणूस आहे म्हणून मंत्रिपद देणार असाल तर मला अजिबात पटणार नाही. पण कर्तृत्वावर मंत्रिपद देणार असाल तर स्वागत आहे, असंही किशोर आप्पा पाटील म्हणाले.

अरे मंत्रिपद काय घ्यायचं, मी तर स्वत:ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो, असं वक्तव्य किशोर पाटील यांनी केलं. या वक्तव्यामुळे काही वेळ चांगलीच खळबळ उडाली.

दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदेंनी मी एकटा नाही तर माझ्यासोबतचे सर्व आमदार मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य केलं. तर एक-एक कार्यकर्ता स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहे हे चित्र राज्यात पहिल्यांदाच दिसलं. हे राज्य सर्वांचं आहे. राज्यात नवं वातावरण दिसतंय, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

“संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त वर्तमानपत्र चालवावं”

‘चार गाढवं एकत्र चरत असली तरी हुकुमशहाला भिती वाटते’, शिवसेनेचा हल्लाबोल

बंडानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार, शिवसेना नेत्याने मानले भाजपचे आभार

‘संजय राऊतांनी गजनी बघावा’, भाजप नेत्याचा हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला