“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर भारतही नसता”

जयपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये देश आणि जग बदलण्याची ताकद आहे. जर संघ नसता तर आपला भारत देशही नसता, असं राजस्थानचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे. 

देशात सध्या लोकशाही आहे. देशाची अखंडता हा देशाचा स्वाभिमान आहे. संघ हा केवळ शब्द किंवा संस्था नाही तर एक मोठं आंदोलन आहे. जे केवळ देशच नाही तर जग बदलू शकतो, असंही पूनिया यांनी म्हटलं आहे. 

इतिहास लपत नाही. इतिहासातलं वास्तव लपत नाही. देशाचं विभाजन कोणी केलं? मुघलांना आणि इंग्रजांशी बात मिळवणी कोणी केली? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी काँग्रेसचं नाव न घेता टीका केली आहे. 

राम मंदिराला उध्वस्त करत बाबरी मशिदीला मुद्दा कोणी बनवलं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते जयपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर ते ‘एनडीटीव्ही इंडिया’शी बोलत होते.

दरम्यान, शनिवारी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी सतीश पूनिया यांची निवड झाली. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधान आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-