‘सत्यमेव जयते’; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांचे सूचक ट्विट

मुंबई | मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. यातच याप्रकरणावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

रोज नवनवीन गौप्यस्फोट करत नवाब मलिक यांनी तर समीर वानखेडेंवर आरोपांचा सपाटाच लावला आहे. कागदपत्र शेअर करत नवाब मलिक यांनी अनेक खुलासे केले. त्यामुळे समीर वानखेडे याप्रकरणात अधिक गुंतत गेेले.

एनसीबी अधिकारी समीर यांच्यासोबत नवाब मलिकांनी त्यांच्या कुटुंबावरही आरोप केले आहेत. त्यामुळे वानखेडेंच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र काल मुंबई हायकोर्टानं त्यांच्या केलेली मागणी अमान्य केली आहे.

नवा मलिक यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यासोबतच समीर वानखेडे व कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह बोलण्यास मलिक यांना मनाई करण्यात यावी, अशी विनंती समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केली होती.

ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मागणीला मुंबई हायकोर्टानं अमान्य केलं आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत, असं प्रथमदर्शनी वाटत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे.

मलिक यांनाही पुरावे एकदा तपासून आरोप करावे, अशी सूचनाही हायकोर्टानं दिली आहे. हायकोर्टाकडून आलेल्या या निर्णयावर मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर ‘सत्यमेव जयते’ असं ट्वीट करत न्यायालयाच्या निर्णयाचं मलिकांनी स्वागत केलं. कुणी चुकीचं करत असेल, कोण अन्याय करत असेल तर त्याविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार आहे अशा शब्दात मलिकांनी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, आता नवाब मलिक नवीन काय गौप्यस्फोट करणार आणखी काय आरोप करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली धक्कादायक माहिती

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणार असाल तर जाणून घ्या हे नवे नियम!

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता

“राज्यात सत्ताबदल होणार, नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार”

शरद पवारांसारखं चंद्रकांत पाटलांनीही केलं भरपावसात भाषण, पाहा व्हिडीओ