“एखाद्या मुलीला एकदा I Love You बोलणं हा गुन्हा होत नाही”

मुंबई | सध्या जगभरात महिलांवर आणि मुलींवर सतत छेडछाड आणि बलात्कार या सारख्या घटना होत आहेत. त्यामुळे पोक्सो कायद्यामुळे त्यासंबंधित अनेक गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

एखाद्या मुलीला एकदा ‘ I Love You ‘ म्हणणं हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा होत नाही. तिला हे बोलून तिचा अपमान होईल असंही होत नाही. तसेच त्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, असं न्यायालयाने सांगितलं.

एका 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाबाबत वडाळा टीटी पोलिसांत तक्रार केली होती. या प्रकरणामध्ये आरोपी मुलाने त्या मुलीला ‘आय लव्ह यू’ असं बोललं होतं. त्यामुळे त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्याने मुलीकडे पाहून डोळा मारला होता. तसेच तिच्या आईला धमकी दिली असल्याचे आरोप तिच्या कुटुंबियांनी केले आहेत. त्यामुळे वडाळा टीटी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार त्या मुलावर गुन्हा दाखल केला होता.

दोषी मुलाने त्या मुलीचा पाठलागही केला नव्हता. त्याने फक्त एकदा तिला ‘ I Love You ‘ म्हटलं आहे. तसेच त्या मुलाने कोणत्याच प्रकारे त्या मुलीला इजा केली नाही.

त्याने फक्त तिच्याबद्दल असणाऱ्या भावना सांगितल्या आणि स्वत:च्या मनातील प्रेम व्यक्त केलं होतं. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाने पोक्सोच्या गुन्ह्यातून 23 वर्षीय तरूणाची निर्दोष सुटका केली.

दरम्यान, हा निकाल न्यायाधीश कल्पना पाटील यांनी दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणावर कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘बांगलादेशातून मुली आणून…’; ‘या’ भाजप नेत्याचा मलिकांवर सनसनाटी आरोप 

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम 

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध; जगासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे 

 मोठी बातमी! युक्रेनमध्ये सैन्य कारवाई करण्याची पुतिन यांची घोषणा