नवाब मलिकांच्या अटकेवर रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. ईडी कर्यालयात मलिक यांना 8 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनीही या प्रकरणावर भाष्य करत मलिकांवर गंभीर आरोप केला आहे.

नवाब मलिक यांना राजकीय हेतुने अटक करण्यात आलेली नसून, त्यांनी वादग्रस्त जमीन खरेदी केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे, असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप सरकारनं सुडाचं राजकारण केल्यामुळे, मलिक यांना अटक झाली असल्यानं महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आज आंदोलन केलं आहे. मुंबईत मंत्रालया शेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं.

भाजप चुकीच्या पद्धतीने ईडीचा वापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

दरम्यान, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार केप्रकल्यारणी ईडीने अटक केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना आज 1993 च्या बॉम्बस्फोटांमध्ये बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“एखाद्या मुलीला एकदा I Love You बोलणं हा गुन्हा होत नाही” 

‘बांगलादेशातून मुली आणून…’; ‘या’ भाजप नेत्याचा मलिकांवर सनसनाटी आरोप 

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम 

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध; जगासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे