ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर रुग्णालयात दाखल!

पुणे | ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinananath Mangeshkar Hospital, Pune) दाखल करण्यात आलंय.

अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे.

अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान केल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोलमाल सिनेमातील त्यांचा डबलरोल आजही लोकं विसरलेली नाहीत. चितचोर, रंगी-बेरंगी, बातों बातों मे हे सिनेमा रसिकांना प्रचंड भावलं होतं. आपल्या सिनेमाची एक वेगळी ओळख त्यांनी हिंदी सिनेक्षेत्रात तयार केली होती. यानंतर त्यांनी शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या पहेली सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं.

10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून आता काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले (Sandhya Gokhale) यांनी म्हटलंय.

अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल पालेकर (Amol Palekar) यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1944 रोजी झाला. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटातही भरपूर काम केले. हिंदी सिनेप्रेमींसाठी ‘गोलमाल’ चित्रपटातील रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा हे नाव ऐकताच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. चित्रपटात रामप्रसाद आपली नोकरी वाचवण्यासाठी दुहेरी भूमिकेचा अवलंब करून मुलीच्या वडिलांना मूर्ख बनवतो. यातील त्यांचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकांना जोरदार हशा पिकला होता.

आपल्या गंभीर अभिनयासोबतच अमोल पालेकर यांनी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यातही यश मिळवले आहे. अमोल पालेकर अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात येण्यापूर्वी बँकेत नोकरी करायचे, असे हे फार कमी लोकांना माहीत असेल. ते बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक होते. याशिवाय अमोल पालेकर हे सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.

महत्वाच्या बातम्या- 

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मोठी अपडेट समोर

मोठी बातमी! आमदार नितेश राणेंना अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर

“माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही”