सुर्यकुमार यादवने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू!

नवी दिल्ली | भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

या सामन्यात सुर्यकुमार यादवने एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यावेळी सूर्यकुमार यादवनं आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील पहिल्या सहा डावांमध्ये 30+ धावा करण्याचा विक्रम केला आहे.

सुर्याने आतापर्यत पाच डावात 31, 53, 39, 34 व 64 अशी कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्या सहा डावांमध्ये 30+ धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आणि त्यात रोहित शर्मानं मोठा डाव टाकला. रोहितनं सलामीला रिषभ पंतला उतरवलं. भारताच्या 12 षटकांत 3 बाद 43 धावा झाल्या होत्या.

दरम्यान, राहुल व सुर्यकुमार यादव ही जोडी चांगली जमलीय असं वाटत असताना राहुलने घाई केली. त्याने 48 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 49 धावा केल्या. सूर्यकुमारनं नंतर फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं.

सूर्यकुमार 83 चेंडूंचा सामना करताना 5 चौकारांच्या वनडेतील सर्वोच्च वैयक्तिक 64 धावा करून माघारी परतला आहे. त्यामुळे आता त्याचं संघातील स्थान कायम राहणार असल्याचं दिसतंय.

दरम्यान, 44 धावांनी दुसरी वनडे जिंकत भारताने मालिकाही खिशात घातली आहे. त्यामुळे आता टी ट्वेंटीमध्ये भारताची कामगिरी कशी राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…

“10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार…”

 “माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही”