काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची भाजपवर जोरदार टीका, म्हणाले…

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्लीतील जहांगीरपुरी आणि मध्य प्रदेशातील खरगोन येथील इमारतींवर बुलडोझरच्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येतंय. अतिक्रमण हटवण्याची ही अनोखी पद्धत मुस्लिम समाज आणि गरिबांना लक्ष्य करण्याच्या उद्देशानं आहे, असं चिदंबरम म्हणाले आहेत.

धर्मनिरपेक्ष असणं पुरेसं नाही. सर्वांनी धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलून धर्मनिरपेक्षतेची पायमल्ली झाल्यास निषेध केला पाहिजे. मी धर्मनिरपेक्षतेबद्दल कोणताही संकोच स्वीकारू शकत नाही, असं चिदंबरम म्हणाले आहेत.

बुलडोझरद्वारे इमारती पाडण्याचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांवर त्यांनी खोचक टीका केली आहे. भाजप नेत्यांनी या कारवाईचं समर्थन केलं आहे, ते कायद्यासोबत खेळण्यासारखं आहे, असंही पी चिदंबरम म्हणाले आहेत.

दरम्यान, बुलडोझर प्रकरणामुळे आता दिल्लीत राजकीय वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी या प्रकरणावरून आक्रमक टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट गरजेची’, केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

‘…तर आम्हाला फाशी द्या’, कोर्टाच्या निर्णयानंतर नवनीत राणांचं ट्विट चर्चेत

प्रत्येक कट उधळला जातोय, भाजपला राज्यात…’, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

“मैं करू तो साला, कॅरेक्टर ढीला है”, अमृता फडणवीसांचा खोचक टोला

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला न्यायालयाचा दणका