‘माझं कौमार्य विकून…’; अभिनेत्रीने शत्रुघ्न सिन्हांवर केलेल्या आरोपाने खळबळ

मुंबई | ‘बिग बॉस 5’ मध्ये दिसलेली पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखतीत बोलताना पूजा मिश्राने सिन्हा कुटुंबावर तिचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला होता.

पूजा मिश्राच्या या आरोपांनी खळबळ उडाली आहे. या मुलाखतीत पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असे आरोप केले आहेत, जे अतिशय धक्कादायक आहेत. मात्र यावर शत्रुघ्न सिन्हा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

एवढंच नाही तर पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबीयांनी तिच्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा दावाही केला होता.

गेल्या 17 वर्षांपासून मी हे सहन करत आहे. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर तिने आत्महत्या केली असती, असं देखील पूजा म्हणाली होती.

गेल्या दोन दशकांपासून या कुटुंबाने माझा पिच्छा सोडला नाही. माझे वडील मुंबईत नोकरीवर असताना, पूनम सिन्हा यांनी वडिलांचं मतपरिवर्तन केलं. बॉलिवूडमध्ये फक्त देहविक्री करणाऱ्याच काम करतात असं त्यांनी बाबांना सांगितलं होतं. हा किती ढोंगीपणा आहे, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणालेत.

दरम्यान, मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये ही असुरक्षितता त्यांच्या मनात नेहमी असायची, म्हणूनच आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा कळतं की या लोकांनी माझे 35 चित्रपट चोरले, असा आरोपही तिने केलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

शेवटी जुळलंच! राणा दा आणि अंजली बाईंनी उरकला साखरपुडा 

 वाद भोंग्यांचा! मुंबई पोलिसांनी दिली ‘इतक्या’ भोंग्यांना परवानगी

 “मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचं कलम लावलं नाही”

 …अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ

“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप