‘राजा कायम पण…’; पाहा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

मुंबई | भेंडवळच्या भाकिताकडं राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असतं.  सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे.

3 मे रोजी संध्याकाळी ही घटमांडणी पार पडली आणि आज भाकीत जाहीर करण्यात आलं. भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचं भाकित केलं जातं.

यंदाही बळीराजाला अवकाळीचा सामना करावा लागणार आहे. भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे.

यंदा जून  महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस असेल, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे.

दरम्यान,

50 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.

गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं.

शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

शेवटी जुळलंच! राणा दा आणि अंजली बाईंनी उरकला साखरपुडा 

 वाद भोंग्यांचा! मुंबई पोलिसांनी दिली ‘इतक्या’ भोंग्यांना परवानगी

 “मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचं कलम लावलं नाही”

 …अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ

“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप