मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. राजकारण, समाजकारण, सिनेजगत या सर्व क्षेत्रांमध्ये वाद सुरू आहेत. यातही सर्वात जास्त मराठी अभिनेते किरण माने यांचा वाद चर्चेत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत आघाडीची भूमिका साकारणारे किरण माने यांना अचानकपणे या मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किरण मानेंची बाजू लावून धरत स्टार प्रवाह वाहिनीवर जोरदार टीका केली आहे. परिणामी वातावरण तापलेलं असताना आता या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे.
किरण माने यांच्याबद्दल त्यांच्या सहकलाकारांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण किरण माने यांना काढून टाकल्यानं मालिकेतील सहकलाकार मात्र वेगळीच कहाणी सांगत आहेत.
किरण माने ज्या सहकलाकारांसोबत काम करत होते. त्यांनी किरण माने यांच्यावर चुकीच्या वागणुकीचा ठपका ठेवला आहे. किरण माने सहकलाकारांशी चांगले वागत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मी आहे म्हणून मुलगी झाली हो ही मालिका चालते. माझ्या मनात आलं तर कोणालाही काढून टाकेन, असं किरण माने म्हणाल्याचा आरोप त्या सहकलाकारांनी केला आहे.
राजकीय भूमिका घेतल्यानं आपल्याला काढला हा आरोप मानेंनी केला होता पण त्यांच्या सहकलाकारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. परिणामी आता कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
आपल्याशी बोलताना किरण माने हे उद्धटपणे वागायचे परिणामी त्यांना मालिकेच्या सेटवर नीट वागण्यासाठी तीन वेळा ताकिद देण्यात आली होती. नंतर त्यांना काढण्यात आल्याचं सहकलाकारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, किरण माने यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात सध्या समर्थन करणारे आणि विरोध करणारे हे दोन गट पडले आहेत. सध्या या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद
शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…