“कंडोमपेक्षा कोरोना टेस्ट महत्त्वाची, सेक्सपूर्वी हे नक्की करा”

नवी दिल्ली | कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. जगभरात कोरोनाच्या एकामागून एक लाटा येताना दिसत आहेत. (adeiacavalheiro suggests a way to get rid of corona)

कोरोना आणि त्याच्या इतर व्हेरियंटमुळे आता जगाचं टेन्शन वाढलंय. त्यामुळे आता कोरोना नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे.

कोरोना लक्षणं दिसल्यास टेस्ट करणं देखील गरजेचं आहे. अशातच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी एका मॉडेलने लोकांना चाचणी किट नेहमी सोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

कोविडचा धोका टाळण्यासाठी मॉडेल इतरांना सेक्स करण्यापूर्वी पार्टनरचा कोरोना तपासण्याचा सल्ला दिला आहे. दीआ कैवेलिएरो माॅडल आणि इन्सटाग्राम इन्फ्युएन्सरने हा सल्ला दिलाय.

जेव्हाही ती एखाद्यासोबत डेटवर जाते तेव्हा तिच्यासोबत रोमान्स किंवा सेक्स करण्यापूर्वी ती नक्कीच कोविड टेस्ट करते. कोरोनापासून वाचता यावं, म्हणून तिने असा सल्ला दिला आहे.

किस करताना आणि सेक्स पाटर्नरसोबत जवळ येताना कोरोना टेस्ट करणं गरजेचं आहे. कोविड रॅपिड टेस्ट किट हे दोन्ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचे आहे, असं दीआ म्हणते.

जी लोकं वन नाईट स्टॅडसाठी जातात, अशा लोकांसाठी दीआने हा खास सल्ला दिला आहे. टेस्टनंतरच सेक्स करणं बरोबर आहे, असंही दीआ कैवेलिएरो म्हणते.

महत्त्वाच्या बातम्या –

किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ

 विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव

अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं”