‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा (Corona) कहर सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाचे अल्फा, बीटा, डेल्टा असे व्हेरियंट आढळून आले. आता नोव्हेंबर महिन्यात यात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटची भर पडली आहे.

वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे कोरोना लसीचा बुस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे. अशात तज्ज्ञांनी एक धक्कादायक दावा केला आहे. यामुळे सर्वांची झोप उडाली आहे. हा व्हेरिएंट कोरोना व्हायरसचा शेवटचा व्हेरिएंट नसणार आहे. कारण असे व्हेरिएंट भविष्यातही पाहायला मिळू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

पुढील व्हेरिएंट कसा दिसेल किंवा तो महामारीला कसा आकार देईल हे आम्हाला माहित नाही. मात्र ओमिक्रॉनच्या सिक्वेलमुळे सौम्य रोग होईल किंवा सध्याची लस त्यावर कार्य करेल याची शाश्वती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांनी कोरोना लसीकरण जलदगतीने सुरू ठेवण्याचं आवाहन केलं असून सध्याची लस या साथीच्या रोगाशी लढण्यासाठी प्रभावी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

बोस्टन युनिव्हर्सिटीचे एपिडेमियोलॉजिस्ट लिओनार्डो मार्टिनस यांनी सांगितलं की, संसर्ग झपाट्याने पसरत असल्यानं ओमिक्रॉनला अधिक उत्परिवर्तन (Mutation) निर्माण करण्याची संधी मिळेल.

ज्यामुळे आणखी व्हेरिएंट्स येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या मध्यात या व्हेरिएंटचं आगमन झाल्यापासून ते जगभर आगीसारखे पसरलं आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, ओमिक्रॉन डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत चौपट गती संक्रमित करते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 71 हजार 202 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 7 हजार 743 वर पोहोचली आहे. देशात 15 लाख 50 हजार 377 सक्रिय रुग्ण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“विराट मान उंच ठेव… तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलंय” 

‘तमाशा बनवलाय माझा’, ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ढसा ढसा रडला ‘हा’ नेता, पाहा व्हिडीओ 

नोकरीची सुवर्णसंधी; दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी बातमी 

तज्ज्ञ म्हणाले,’Omicron ची एकदा नाहीतर इतक्या वेळा लागण होऊ शकते’ 

काळजी घ्या! कोरोना रूग्णसंख्येत वाढ सुरूच, वाचा आजची ताजी आकडेवारी