“सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री है”

मुंबई | राज्यातील विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेते यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळी ही सुरूच असते. अशातच भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री है, असं म्हणत मुनगंटीवारांनी म्हटलं आहे. आमदार म्हणून निवडून आलेले आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशनचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन राज्यातील सरकार स्थापन झालं आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे असल्याचं ते म्हटले आहेत.

स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. उद्या मध्यान्न भोजन मी बघितलं, विद्यार्थ्यांच्या आरोग्य उत्तम राहावं, उद्या तर हे नेते म्हणतील त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी त्यांना हर्बल वनस्पती सध्या शाळेतच द्या, असं म्हणत त्यांनी राज्यसरकारव चांगलाच वार केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! चक्क गाडीचालकाविना धावतीय दुचाकी, पाहा व्हायरल व्हिडीओ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, पाहा आजचा दर

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा! 26 ऑक्टोबरपासून ‘या’ भागात पाऊसाची शक्यता

सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचा दर

महिला चक्क भल्यामोठ्या अजगराला खेळवतीय खांद्यावर अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ