नवऱ्याला झोपेत SEX करण्याचा आजार, बायकोनं लावला डोक्याला हात

मुंबई | झोपेत माणसाला चालण्याची, बोलण्याची आणि रडण्याची सवय असते, असं ऐकत आलो आहे. मात्र, झोपेत चक्क सेक्स (Sex) करण्याची सवय असते, हे पहिल्यांदाच ऐकलं असेल.

एका महिलेने एका पैरेंटिंग फोरमला सांगितलं आहे की, तिचा नवरा झोपेत हातपाय मारतो, तिला ओरडतो आणि जबरदस्तीने सेक्स करतो, असं महिलेने सांगितलं आहे.

सेक्सोमॅनियाने (sexomania)त्रस्त असलेल्या पुरुषाच्या पत्नीने तिची समस्या जगासमोरह मांडली आहे. स्लिप डिसाॅर्डर विकारामुळे तिचा नवरा झोपेत विचित्र वागतो आणि लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो, असंही महिला म्हणते.

सेक्सोमेनिया हा झोपेचा विकार किंवा पॅरासोमनियाचा एक प्रकार आहे जो एखाद्या व्यक्तीला झोपेच्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो.

मागील 10 वर्षापासून महिला तिच्या पतीसोबत राहत आहे. माझ्या पतीच्या सेक्सचा मला त्रास होतो. मात्र, तो दररोज रात्री असं करत नाही. मी डोळे उघडल्यावर त्याचे हात माझ्या अंगावर असतात, असंही ती म्हणाली.

माझे डोळे उघडताच मी त्याला जोरात ढकलते ज्यामुळे त्याची झोप मोडते आणि सर्व काही थांबते, असंही ती म्हणाली आहे. मात्र, त्याला झोपेत काय झालं याबद्दल काहीही माहिती नसतं,असंही त्या महिलेने सांगितलं आहे.

जेव्हा मला हे कळले तेव्हा ते माझ्यासाठी खूप भीतीदायक होतं. त्यामुळे मला बलात्कार झाल्यासारखं वाटलं. त्यावेळी मी डोक्याला हात लावला, असंही महिलेने फोरमवर बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, फोरमवर बोलताना अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवऱ्याला आजारी माणसासारखं वागवावं, असं सल्ला देखील दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘लेडी सेहवाग’चा जलवा बरकरार! पुन्हा जागतिक क्रमवारीत गाठलं अव्वल स्थान

 “किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य

“पूनम महाजन सध्या कुठं आहेत? त्यांचं भाजपशी नातं काय?”

“… कबूलीनामा संजय राऊतांनीच दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?”

 महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो