‘काश्मीर अवर’ मोहिम अंतर्गत शाहीद आफ्रिदी आणि जावेद मियाँदाद उतरणार रस्त्यावर!

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तानने आता एक नवीन नाटक सुरु केलं आहे. येत्या शुक्रवारी ‘काश्मीर अवर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानी नागरिक रस्त्यावर उतरणार असल्याचं समोर आलं आहे. या मोहिमेमध्ये पाकिस्तानचे खेळाडू शाहीद अफ्रिदी आणि जावेद मियाँदाद हे सुद्धा सहभागी होणार आहेत. 

शाहीद आफ्रिदीने ट्वीट करत ‘काश्मीर अवर’ या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन पाकिस्तानी नागरिकांना केलं आहे. मी शुक्रवारी दुपारी 12 वाजता मजार-ए-कैद येथे हजर राहणार आहे. काश्मिरप्रती सहानुभूती दर्शवण्यासाठी तुम्हीही या मोहिमेत सहभागी व्हा, असं आवाहन आफ्रिदीने केलं आहे.

मी शहीद सैनिकांच्या कुटुंबाला 6 सप्टेंबर रोजी भेटणार आहे आणि लवकरच नियंत्रण रेषेवरही (LOC) जाऊन येणार आहे, असंही शाहीद अफ्रिदीने म्हटलं आहे.

जे लोक एलओसीचा दौरा करणार आहेत अशा लोकांसोबत मी आहे. आम्ही एलओसीवर जाऊन तिथे शांततेसाठी प्रार्थना करणार आहोत. भारत आणि पाकिस्तान सर्व मुद्दे शांततेत आणि सामंजस्याने सोडवतील अशी आशा आहे, असं ट्वीट जावेद मियाँदादने केलं आहे.

शाहिद आफ्रिदी ट्वीट- 

जावेद मियाँदाद ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-