शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱा तरूण म्हणतो, ‘या देशात फक्त हिंदूंचं चालणार’!

नवी दिल्ली | दिल्लीतील जामीया विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना शाहीनबाग परिसरातही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यावेळी तरुणाने ‘या देशात फक्त हिंदूंची चालणार, इतर कोणाचेही नाही’ असं वक्तव्य केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्यांवरुन शाहीनबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलन ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेकेटसजवळ येऊन या तरुणाने हवेत गोळीबार केला.

तरुणाने शाहीनबागमधील आंदोलकांना धमकीही दिली. ही जागा ताबडतोब खाली करा, असं तो म्हणाला. गोळीबार होताच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. तरुण पूर्व दिल्लीचा रहिवासी असल्याचं कळतंय.

दरम्यान, 29 जानेवारी म्हणजे महात्मा गांधींच्या पुण्यतीथी दिवशी रामभक्त गोपाल या तरुणाने जामीयात गोळीबार केला होता. आता शाहीनबागमध्येही एका तरुणाने खुलेआम गोळीबार केल्याने सीएएवरुन देशातील वातावरण बिघडत असल्याचं चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या-.

-शेतीसाठी निधीची तरतूद अत्यंत कमी; अर्थसंकल्पावरुन राजू शेट्टींची टीका

-…म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पूर्ण अर्थसंकल्प वाचताच आला नाही!

-मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार???

-केंद्र सरकारची पुन्हा राजधानीकरांना सावत्रपणाची वागणूक; अर्थसंकल्पावर केजरीवाल भडकले

-येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस