शेतीसाठी अत्यंत कमी निधी दिलाय; अर्थसंकल्पावर राजू शेट्टी नाराज

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला. या अर्थसंकल्पात अनेत महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.

आजच्या बजेटमध्ये शेतीसाठी अर्थमंत्र्यांनी कमी निधीची तरतूद केली आहे. भारतीय शेतीचा आकारमान पाहता हा निधी अतिशय कमी आहे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आजच्या बजेटमध्ये काहीच नवीन नाही. आजच्या बजेटमधून साखर उद्योगासंदर्भात कोणताही नवीन आणि ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अर्थमंत्र्यांनी शेतीसाठी भरीव निधी दिला असं सांगितलं जातंय. मात्र शेतकऱ्यांसाठी हा बुडबुडा आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारने कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटींची तरतूद केली तर 1 लाख 23 हजार कोटींची जलसंधारण ग्रामीण विकासासाठी तरतूद केली.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पूर्ण अर्थसंकल्प वाचताच आला नाही!

-मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार???

-केंद्र सरकारची पुन्हा राजधानीकरांना सावत्रपणाची वागणूक; अर्थसंकल्पावर केजरीवाल भडकले

-येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

-महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय