मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस सरकारचा रखडलेला आणि बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. त्यानंतर खातेवाटप देखील झाले. परंतु यावेळी जड आणि महत्वाची खाती भाजपला मिळाली.
त्यामुळे या खातेवाटपात शिंदे यांच्या गटाच्या तोंडाला पाने पुसली, असे सगळीकडे बोलले जात आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या गटातील दादा भुसे (Dada Bhuse), संदिपान भुसे (Sandeepan Bhuse) यांच्यासह अनेत मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.
सरकार मधील असंतोष आणि नाराजी नाट्यावरुन विरोधकांनी सरकारवर पोटभरुन टीका करुन घेतली आहे. या नाराजीवर शिंदे गटातील आमदार शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी भाष्य केले आहे.
आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कुणीही मिळालेल्या खात्यावर नाराज नाही. त्यासंदर्भात कोणी तुमच्यासोबत बोलले आहे का? आमच्यासोबत कुणीही तसे काही बोलले नाही. जाणीवपूर्वक अशा वावड्या उठविल्या जात आहेत, असे देसाई म्हणाले.
आम्ही पहिल्या टप्प्यातील शपथ घेणारे नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांना कोणते विभाग द्यायचे? हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा निर्णय आहे. आणि त्यांना त्यांचे अधिकार आहेत.
तसेच आम्ही शिवसेनेच्या 40 आमदार आणि 11 अपक्ष आमदारांनी संगनमताने मंत्रिमंडळाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य आहेत, असे शंभुराज देसाई म्हणाले.
आमचे सर्व मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर खुश आहेत आणि त्यांच्यापैकी कोणीही नाराज नाही. त्यांच्या विरोधात ह्या वावड्या उठविल्या जात आहेत, असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या खात्यावर आपले काम चांगल्याप्रकारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तो आम्ही करत राहणार आहोत. आमच्यापैकी कोणीही नाराज नसल्याचे देसाई म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
विनायक मेटे अपघात प्रकरण : नवीन माहिती समोर, दोन गाड्या करत होत्या…
“एक गट अन् बारा भानगडी”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…
मेटे यांचा मृत्यू संशयास्पद; त्यांच्या पत्नीचा दावा, म्हणाल्या …
स्वतंत्र्यदिनी सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन वाद, वाचा सविस्तर बातमी…
“स्वतंत्र्य भारतात जन्माला आलेला मी पहिला…” – नरेंद्र मोदी