मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यावर, शिवसेनेच्या अनेक गोष्टींवर आपल्या गटाचा अधिकार सांगितला. शिंदे यांनी आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा केला.
तसेच शिंदे यांनी शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्या गटाला मिळावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) मागणी केली होती. त्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
आता या प्रकरणात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणीचा महत्वाचा निर्णय एन. व्हि. रमणा (N. V. Ramana) यांनी घेतला आहे. या याचिकेवर रमणा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
शिवसेनेने बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरविल्याची नोटीस काढली होती. त्यावेळी त्यांच्या याचिकेला शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले होते.
तर शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत आणि अपात्र आमदारांची नोटीस प्रलंबित असताना देखील घेतलेल्या बहुमत चाचणीवर शिंदे गटाविरोधात याचिका दाखल केली आहे.
या विविध याचिकांवर न्यायालयात सुनावण्या होत आहेत. परंतु न्याय देण्यास दिरंगाई होत आहे. शिंदे आणि शिवसेना (Shivsena) वादावर न्यायालयात तारीख पे तारीख खेळ सुरु आहे. .
येत्या 22 ऑगस्ट रोजी त्यांच्या सहा याचिकांवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने एन. व्हि. रमणा यांच्या खंडपीठाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये असंतोष? शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…
विनायक मेटे अपघात प्रकरण : नवीन माहिती समोर, दोन गाड्या करत होत्या…
“एक गट अन् बारा भानगडी”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…
मेटे यांचा मृत्यू संशयास्पद; त्यांच्या पत्नीचा दावा, म्हणाल्या …
स्वतंत्र्यदिनी सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन वाद, वाचा सविस्तर बातमी…