जितेेेंद्र आव्हाडांच्या साथीने शरद पवारांनी मारला झणझणीत कोंबड्यावर ताव!

शहापूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेेेंद्र आव्हाड शहापूर दौऱ्यावर होते. भगवान सांबरे रूग्णालय संचलित हेमंत सुपर कर्करोग स्पेशलिस्ट रूग्णालयाचं भूमिपूजन शरद पावारांच्या हस्ते करण्यात आलं.

शरद पवार यांनी यावेळी आदिवासी पाड्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. दोऱ्याचा पाडा येथील रामचंद्र खोडके यांच्या घरी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जेवण केलं.

ठाणे-मुंबईपासून काहीच अंतरावर असलेल्या पाड्यात सोयी-सुविधांचा अभाव असल्याचं सांगत या रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील जनतेला त्यांना परवडेल अशा खर्चात उपचार होतील असं शरद पवार म्हणाले.

आदिवासी नृत्याचं चित्रीकरण शरद पवार स्वत: आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून करत होते. आदिवासी कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी आदिवासी पाड्यावर जेवण करत-करत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

 

महत्वाच्या बातम्या-  

-सरकार एलआयसीमधील मोठा हिस्सा विकणार- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

-“आता शेलारांना काही कामच उरलं नाही म्हणून ते टिंगलटवाळगी करत सुटले आहेत”

-लोकेश राहूलने मोडला रनमशिन कोहलीचा ‘तो’ विक्रम

-केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार

-मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहुद्या कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यावर बोचरी टीका