जगात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ, चीनमधून 324 भारतीय मायदेशी

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी 324 भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आलं आहे.

एअर इंडियाने वुहानमध्ये फसलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आज पहिल्या विमान फेरीत 324 भारतीय मायदेशी परतले.

क्रू व्यतिरिक्त विमानात प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन काळजी घेण्यासाठी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील 5 डॉक्टरांचं पथकही होतं. त्यांच्यासोबत एअर इंडियाच्या पॅरामेडिकल स्टाफचा एक सदस्यही सहभागी होता.

दरम्यान, दरम्यान, आतापर्यंत कोरोना व्हायरसने चीनमध्ये 213 लोकांचा जीव घेतला आहे. तसेच जवळपास 10 हजार लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-जितेेेंद्र आव्हाडांच्या साथीने शरद पवारांनी मारला झणझणीत कोंबड्यावर ताव!

-सरकार एलआयसीमधील मोठा हिस्सा विकणार- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

-“आता शेलारांना काही कामच उरलं नाही म्हणून ते टिंगलटवाळगी करत सुटले आहेत”

-लोकेश राहूलने मोडला रनमशिन कोहलीचा ‘तो’ विक्रम

-केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार