मुंबई | काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेसमध्ये युवांना संधी मिळत नसल्याची टीका केली. यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदेंचा जोरदार समाचार घेतला आहे.
काँग्रेसमध्ये युवांना संधी मिळत नाही, ही शिंदेेंची टीका पटत नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि भविष्य देखील आहे, अशा शब्दात त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राने काळजी करू नये, असं म्हणताना भाजप नेत्यांना त्यांनी टोला लगावला. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ नक्की पूर्ण करेल यात मला शंका वाटत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेशमधलं सरकार अजून गेलेलं नाहीये. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात अस लोकांना वाटतं. आपण बघूया दोन दिवस काय होतं, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
जरा थांबा… कमलनाथ अजूनही चमत्कार करु शकतात; शरद पवारांना विश्वास
-कोरोना पासून वाचण्यासाठी पंकजाताईंनी दिला हा सल्ला…
-मोदींच्या हातात भारताचं भविष्य सुरक्षित; भाजपात येताच महाराजांना साक्षात्कार
-ज्योतिरादित्य शिंदेंच्या हाती कमळ; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
-आता शरद पवारांचाही बाप काढणार का?; गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर