मुंबई | ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांचं ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठं असेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भगतसिंग कोश्यारींना लगावला आहे.
शरद पवार यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त कोकण दौरा केला. दोन दिवस पवारांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी ते बोलत होते.
भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे.
दरम्यान, शरद पवारांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावर भाष्य केलं आहे. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करा- शरद पवार
-…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल- उद्धव ठाकरे
-कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरेंच्या जागी कोणी दुसरं असतं तर…- जितेंद्र जोशी
-लग्नास नकार दिल्यानं भाच्यानं मामाच्या पोरीला पळवलं, उसाच्या फडात रंगला पकडापकडीचा खेळ