निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करा- शरद पवार

रत्नागिरी |  निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या प्रत्येकाला आर्थिक मदत करा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केली आहे.  निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाचा पवारांनी पाहाणी दौरा केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नुकसान झालेल्या बाधितांपर्यंत शासकिय यंत्रणा अजून सगळीकडे पोहचली नाही. आताही आपण प्राथमिक अंदाज घेत आहोत. कोकणात नारळ, सुपारीबरोबर मसाल्याची पिकं देखील घेतली जातात, त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आपल्याला या सगळ्यांना मदत करायची आहे, असं पवार म्हणाले.

कोकणात बागांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बागांच्या नुकसानीसाठी मदत करताना पाच-सात वर्षांचा विचार करावा लागेल कारण फळांच्या बागा ह्या काही दिवसांत-महिन्यांत उभ्या राहत नाहीत, असंही पवारांनी यावेळी आवर्जून नमूद केलं.

नॅशनलाईज बँकेचं कर्ज काढल्याचं अनेक लोकांनी मला सांगितलं आहे. अशा कर्ज काढलेल्या लोकांची, गावातल्या लोकांनी यादी करावी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीकडे द्यावी, यानंतर केंद्राची मदत घेऊन बँकांसमोर हा विषय  मांडता येऊ शकतो, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल- उद्धव ठाकरे

-कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरेंच्या जागी कोणी दुसरं असतं तर…- जितेंद्र जोशी

-लग्नास नकार दिल्यानं भाच्यानं मामाच्या पोरीला पळवलं, उसाच्या फडात रंगला पकडापकडीचा खेळ

-“नक्की खोटं कोण बोलतंय, नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस?”

-‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात?, केस कुठं कापतात?’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला