“कायदा आणि सुव्यस्थेसाठी शरद पवारांनी घराबाहेर पडू नये”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यांच्यासह ईडी कार्यालया पर्यंत हजारो कार्यकर्तेही असणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच आज मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळणार असल्याचं दिसतंय.

कायदा आणि सुव्यवस्था अधिकारी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत ईडी कार्यालयाबाहेर कलम 144 ( जमावबंदी ) लागू केले आहे.

शरद पवार बाहेर पडले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून त्यांनी घराबाहेर पडू नये, पोलीस विनंती करणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था शरद पवार यांची भेट घेणार, त्यांच्या घरी येऊन भेट घेणार आहेत.

शिखर बँक घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडी ने मनी लॉड्रींगचा गुन्हा नोंदवला आहे.  या कथित प्रकरणात शरद पवार यांचे नाव नसतानाही त्यांची नोटीस काढली असल्याचे सांगत कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पार्श्वभूमीवर आज ईडी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-