अजित पवारांचं विधान दिशाभूल करणारं, आम्ही महाआघाडीचंच सरकार आणणार- शरद पवार

मुंबई | अजित पवार यांचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत आहे. आम्ही एकमताने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

शनिवारी धक्कादायकरित्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आज त्यांनी आभार प्रदर्शनाचा धडाकाच लावला. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्याच ट्वीटला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अजित पवार यांच्या भूमिकेवर खुलासा केलेला आहे. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर अजित पवार काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

शरद पवार यांचं ट्विट-

 

 

महत्त्वाच्या बातम्या-