राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी शरद पवार मैदानात!

मुंबई | विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून सत्ताधारी सेना-भाजपत जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात राष्ट्रवादीला नवी उमेद देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत. 

पुढच्या आठवड्यात शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात होतेय. राज्यभर दौरा करून राष्ट्रवादीला पुन्हा ताकदीने उभी करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरत आहेत.

17 सप्टेंबरपासून शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन ते नेते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

शरद पवारांच्या बुद्धी चातुर्यांचा अंदाज सहजासहजी कुणाला येत नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत ते काय रणनिती आखणार अन् पक्ष सोडणाऱ्यांच्या कोंडी करण्यांसमोर कोणता मास्ट्रस्ट्रोक टाकणार हे येत्या काळात समोर येईल.

दरम्यान, राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काय रणनीती आखणार आणि शरद पवार फॅक्टर कितपत यशस्वी होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-