“पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण निर्माण केलं जातंय”

मुंबई | पाकिस्तान आणि भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण निर्माण केलं जातंय, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते अल्पसंख्याक मेळाव्यात बोलत होते.

पाकिस्तानमध्ये एवढी परिस्थिती वाईट नाही. काही लोक आपल्या फायद्यासाठी वातावरण दुषित करत आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना पाकिस्तानला जायचो. तेव्हा तिथं वेगळं वातावरण असायचं. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

मी याआधी मॉब लिंचिंग हा शब्द ऐकला नव्हता. एखादी व्यक्तीचा जन्म जर भारतात झाला तर त्या व्यक्तीला मी हिंदुस्तानी आहे असं का बोलायला सांगितलं जातं, असा सवालही शरद पवारांनी या प्रसंगी उपस्थित केला. 

दरम्यान, राज्यात ओला दुष्काळ आहे. पूरपरिस्थिती गंभीर असतानाही देशाच्या प्रमुखांनी या परिस्थितीची पाहणी केली नाही, असं पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-