रामदास आठवलेंचा मौके पे चौका; उदयनराजेंचा भाजप प्रवेश होताच दिला पुष्पगुच्छ!

नवी दिल्ली |  हो नाही म्हणता म्हणता राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांनी रात्री 1 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा सोपवला. आज शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांनी भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय सामाजिक न्यायविकास राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.

चंद्रकांत पाटील यांनी प्रस्तावना करत उदयनराजे यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. यानंतर अमित शहांनी उदयनराजेंचं स्वागत केलं. लगोलग रामदास आठवले यांनीही राजेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी चलाखी केली. त्यावर आओ… आओ आठवलेजी… आप आईये असं म्हणत त्यांना अमित शहांनी पुढे बोलावलं.

आठवलेंनी मग अमित शहांना एक पुष्पगुच्छ आणि उदयनराजेंना एक पुष्पगुच्छ देत त्यांचं भाजपत स्वागत केलं. यावेळी आठवलेंनी ‘मौके पे चौका’ मारणं पसंत केलं.

भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. मोदींच्या कार्यशैलीवर माझं प्रचंड प्रचंड प्रेम आहे, अशी स्तुतीसुमने उदयनराजेंनी उधळली.

दरम्यान, छत्रपतींचे वंशज भाजपत आल्याचा मोठा आनंद असल्याचं मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-