इतिहासात अशी इंधन दरवाढ मी पाहिली नाही- शरद पवार

सातारा |  आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी पवारांनी पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर, भारत-चीन वादावर तसंच इंधन दरवाढीवर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी इतिहासात अशी इंधन दरवाढ मी पाहिली नाही, असं पवार म्हणाले.

इंधन दरवाढ दररोज होत आहे हे इतिहासात कधी पाहिलं नाही. सर्वसामान्य संकटात असताना अशा परिस्थितीत योग्य निर्णय अपेक्षित आहे. मात्र दरवाढीने इकॉनॉमीवर परिणाम होतोय, घरापर्यंत परिणाम होतो, असं म्हणत पवारांनी इंधन दरवाढीवर भाष्य केलं.  लॉकडाऊनवर लोकं बोलत नाहीत म्हणून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं, त्यांची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे.

चीनने पूर्वी भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही हे माहीत नाही. राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी  केलं.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा

-देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर अजित पवार म्हणाले…

-पडळकरांच्या त्या जहाल टीकेवर शरद पवार अखेर बोलले, म्हणाले…

-राष्ट्रवादीने आम्हाला ऑफर दिली होती म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांनी दिलं उत्तर

-शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट; साताऱ्यात चर्चांना उधाण!