काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने छापा टाकला आहे. ईडीकडून बायोटेक संधेसारा घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांची चौकशी सुरु आहे.

स्टर्लिंग बायोटेक घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांच्यावर 15 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दरम्यान याआधी ईडीकडून अहमद पटेल यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

ईडीने अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र अहमद पटेल यांनी कोरोनाची परिस्थिती आणि 65 वर्षांवरील वय हे कारण सांगत चौकशीला जाणं टाळलं होतं. यानंतर आता ईडीकडून थेट त्यांच्या घरावरच छापा टाकण्यात आला आहे. यानंतर ईडीकडून अहमद पटेल यांचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, ईडीच्या छाप्यानंतर अहमद पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर अजित पवार म्हणाले…

-पडळकरांच्या त्या जहाल टीकेवर शरद पवार अखेर बोलले, म्हणाले…

-राष्ट्रवादीने आम्हाला ऑफर दिली होती म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांनी दिलं उत्तर

-शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट; साताऱ्यात चर्चांना उधाण!

-वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात….; उर्जामंत्र्याचे स्पष्ट निर्देश