दसरा मेळाव्याबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले शिवाजी पार्क आणि…

मुंबई | शिवसेनेची (Shivsena) ओळख असलेला दसरा मेळावा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण शिवसेनेत मख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरी शिवसेना कोणाची आणि दसरा मेळावा कोणी घ्यावा? हे सध्या कळीचे मुद्दे झाले आहेत. शिवसेनेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप एकाही गटाला परवानगी दिली आहे.

आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते सोलापूर जिल्ह्यात प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.

शिवाजी पार्क (Shivaji Park) म्हणजेच शिवसेना हे समीकरणच आहे, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना म्हणत त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची पाठराखण केली.

बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. तसेच दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे. ती लक्षात घेता, त्यांनी केलीली मागणी गैर नसल्याचे शरद पवार म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. ते सुद्धा दसरा मेळावा घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी बीकेसीचे मैदान (BKC Ground) मागितले आणि त्यांना ते मिळाले देखील. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेला विरोध करण्याचे काही कारण नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –