शिवसेनेचे मी जाहीर आभार मानतो- शरद पवार

मुंबई |  शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन दिलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी शिवसेनेचे आणि राऊतांचे आभार मानले आहेत.

शिवसेना आणि राऊतांसोबतच पवारांनी राहुल गांधी यांचे देखील आभार मानले आहेत. तसेच मला पाठिंबा देणाऱ्यांचा मी आभारी आहे, असंही म्हटलं आहे.

अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि कृषी क्षेत्रात खूप काम केलं आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण ईडीने त्यांच्यासोबत चुकीचं केलं आहे असंच मी म्हणेन. या घोटाळ्यावरुन विधानसभेत चर्चा झाली होती तेव्हा त्यांचं नाव नव्हतं. ईडी आज देवापेक्षाही मोठी झालं आहे ? देव माफ करु शकतो, पण ईडी नाही, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान,  शरद पवार आज दुपारी 2 वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय पाठीमागे घेतला.

महत्वाच्या बातम्या-