मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिखर बँक प्रकरणी आरोप ठेवण्यात आल्याने त्यांना समर्थन देण्यासाठी नेते पुढे येत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीदेखील रस्त्यावर उतरत शरद पवारांना आपला पाठींबा दिला आहे.
मोदी-शहा यांना विनाशकाली विपरीत बुद्धी आलेली आहे. भाजपाच्या विनाशकालाची सुरुवात झाली आहे, असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी आपण शरद पवारांना आपला पाठींबा असल्याचं सांगितलं.
लोकशाही समोर आलेल्या अभूतपूर्व अशा संकटसमयी मोदी शहा यांच्या हुकुमशाही विरोधात शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी काँग्रेसचं तमाम नेतृत्व ठामपणे उभं आहे. आज मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलनात सहभागी झालो, असंही सावंत यांनी सांगितलं आहे.
राहुल गांधींनी पवारांना फोन करत आपण पाठीशी असल्याचं सांगितलं. तसंच शिवसेना आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आपला पाठींबा पवारांना असल्याचं सांगितलं.
दरम्यान, शरद पवारांनी राहुल गांधी आणि संजय राऊतांसोबत शिवसेनेचे आभार मानले आहेत.
पवार साहेबांच्या समर्थनार्थ आंदोलनातील क्षण
मोदी शाह यांना विनाशकाले विपरीत बुद्धी आलेली आहे. भाजपाच्या विनाशकालाची सुरुवात झाली आहे. pic.twitter.com/608p7OfSsU— Sachin Sawant (@sachin_inc) September 27, 2019
लोकशाही समोर आलेल्या अभूतपूर्व अशा संकटसमयी मोदी शाह यांच्या हुकुमशाही विरोधात @PawarSpeaks साहेबांच्या आणि @NCPspeaks च्या पाठीशी @INCIndia व आमचं तमाम नेतृत्व ठामपणे उभं आहे.
आज मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलनात सहभागी झालो. pic.twitter.com/6NzVUg6dHW— Sachin Sawant (@sachin_inc) September 27, 2019
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला- शरद पवार https://t.co/s7kDMa22jP @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
वातावरण फिरलंय सरकार घाबरलंय…; कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला! https://t.co/W3vlLbHAej @NCPspeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
…म्हणून पवार साहेबांनी त्यांचा निर्णय मागे घेतला- धनंजय मुंडे – https://t.co/kAAmebq8Qh @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019